बेळगाव : बेळगावमधील वड्डरवाडी येथील विवाहित महिला व तिच्या आईवर हल्ला केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. मात्र, या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली असून हल्ला झालेल्या महिलेविरोधात ११ वर्षीय मुलाने गंभीर तक्रार नोंदविली आहे.
बेळगावमधील वड्डरवाडी येथे एका विवाहित महिलेला व तिच्या आईला घरात घुसून कपडे फाडून हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर संबंधित महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेच्या मुलानेच दिली फिर्याद दिली आहे. घरात अनोळखी व्यक्ती आल्यानंतर आपल्याला मद्य, सिगारेट तसेच गर्भनिरोधक आणावयास सदर महिलेने सांगितले होते. याचा जाब विचारत माझ्या आईने हे कृत्य थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा या महिलेसोबत वाद झाला. त्यानंतर तिनेच आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून माझ्या आईला तुरुंगात पाठवले, असे या मुलाने तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणात संबंधित महिलांच्या हल्ल्याची तक्रार आधी नोंद झाली होती. मात्र, ११ वर्षीय मुलाच्या आरोपांनी या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. माळमारुती पोलीस सध्या दोन्ही बाजूंनी सखोल चौकशी करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta