Wednesday , March 4 2026
Breaking News

श्री ज्योतिबा मंदिर शिवबसव नगर बेळगाव यांच्या वतीने रविवारी दीपोत्सव

Spread the love

 

 

बेळगाव : श्री ज्योतिबा मंदिर शिवबसव नगर बेळगाव यांच्या वतीने रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 11 हजार दिप लावण्याची संकल्पना करण्यात आली असून सकाळी 7 वाजता अभिषेक व विशेष पूजेने दीपोत्सवास सुरुवात होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता दीप लावण्यास प्रारंभ होईल. त्यानंतर रात्री ठीक 8 वाजता महाआरती होईल त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व भाविकांनी दीपोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती श्री ज्योतिबा मंदिर शिवबसव नगर बेळगावचे अध्यक्ष अमर येळ्ळूरकर यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

रक्तासारखा लाल ‘ब्लड मून’… ढगाळ वातावरणात बेळगावकरांना घडला ‘ब्लड मून’ नजारा

Spread the love  बेळगाव : यंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज अवघ्या काही वेळापूर्वी पार पडले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *