
बेळगाव : शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात दरवर्षी कार्तिक दीपोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदाही या दीपोत्सवाने मंदिराचा परिसर प्रकाशमय करून टाकला. ११ हजार दिव्यांच्या प्रकाशात मंदिर परिसराने एक नव्या तेजाने भरून गेला होता.
या निमित्ताने मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विविध रंगांनी भरलेल्या रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर अधिकच सुंदर दिसत होता. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्या होत्या. हजारो भक्तांनी दीपोत्सवात सहभागी होऊन आपल्या श्रद्धेचा जागर केला. या दिव्यांच्या प्रकाशाने भक्तांच्या मनात नवचैतन्य जागवले. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा उत्सव म्हणजे आध्यात्मिक उर्जेचा उत्सव होता.
मंदिर समितीने या प्रसंगी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “दीपोत्सव हा मंदिराच्या परंपरेतील महत्त्वाचा सण आहे. यंदाही भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हा उत्सव यशस्वी केला.”कार्तिक महिन्यात साजरा होणारा हा दीपोत्सव परिसरातील भाविकांसाठी एक महत्त्वाचा सोहळा आहे. मंदिराचा परिसर, आकर्षक रांगोळ्या, आणि दीपमालांच्या झगमगाटाने हा दिवस भक्तांसाठी संस्मरणीय ठरला.
Belgaum Varta Belgaum Varta