बेळगाव : आद्य समाजसुधारक, स्त्रियांचा पालनहार, क्षुद्राती शुद्रांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दरवर्षी मराठी विद्यानिकेतन शाळेतर्फे आंतरशालेय क्क्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये द. म. शि. मंडळाच्या सर्व शाळांच्या प्रत्येकी 2 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच बेळगाव आणि परिसरातील मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. एकूण 70 स्पर्धकांचा सहभाग होता. या स्पर्धेसाठी खालील विषय दिले होते.
1) मराठी भाषा अभिजात भाषा
2) महात्मा जोतिबा फुलेंचे शैक्षणिक कार्य
3) पर्यावरणाचे बदलते स्वरूप आणि शेतकरी
4) निवडणूक व विविध राष्ट्रीय पक्षांचे जाहीरनामे
ही स्पर्धा दि. 25/11/2022 रोजी मराठी विद्यानिकेतन शाळेत आयोजित केली होती. स्पर्धेचे उद्घाटन बालिका आदर्श मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी यांनी केले. स्पर्धेसाठी 2 फेऱ्या होत्या. एकूण चार परीक्षक होते, पहिल्या फेरीनंतर 16 स्पर्धकांची निवड केली गेली. प्राथमिक फेरीत परीक्षक म्हणून शिवराज चव्हाण, प्रतापसिंह चव्हाण, नीला आपटे, शिवाजी हसनेकर तर अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून प्रा. सुरेश पाटील , मयूर नागेनट्टी उपस्थित होते. यामध्ये प्रथम क्रमांक संपूर्णा शशिकांत पाटील (वाघवडे हायस्कूल वाघवडे), द्वितीय क्रमांक तृप्ती यशवंत म्हाकेकर (भाई दाजीबा देसाई विद्यालय पारले), तृतीय क्रमांक वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर (महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूर),
तर उत्तेजनार्थ मनाली सुभाष बराटे (मराठी विद्यानिकेतन बेळगाव), ऋषभ चंद्रकांत सुतार (बालवीर विद्यानिकेतन, बेळगांव),कृतिया आंबोटकर (ज्योती सेंट्रल स्कूल बेळगाव),शिवनंदिनी सिद्धाप्पा धनाजी (लाल बहादूर शास्त्री विद्यालय मणगुत्ती), प्रसाद बसवंत मोळेराखी मराठी विद्यानिकेतन बेळगाव या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मराठी विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, भारती शिराळे, सुनिता पाटील, अश्विनी हलगेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रमुख शैला पाटील व स्नेहल पोटे, स्पर्धाप्रमुख नम्रता पाटील, विद्यार्थी उपस्थित होते.
30 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा संपन्न होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta