
26 केएआर बटालियन अंतर्गत सेंट जोसेफ छात्रांचा सहभाग
बेळगाव : 26 एनसीसी केएआर बटालियनअंतर्गत येणार्या सेंट जोसेफ छात्रांच्यावतीने बुधवारी सायक्लाथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 77 व्या एनसीसी स्थापना दिनानिमित्त ही सायकल रॅली पार पडली.
बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सेंट जोसेफ हायस्कूलच्या पाठीमागील गेटपासून याला प्रारंभ झाला. 26 केएआर बटालियन अंतर्गत झालेल्या या सायक्लाथॉनचा मुख्य उद्देश एकजुटीचा संदेश, देशासाठी एकात्मत्मेचे महत्व, देशाभिमान याबरोबरच इतरांना उत्तम आरोग्य राखणे, तसेच प्रदूषण कमी करण्याबरोबरच निसर्ग संरक्षणाला महत्व देण्याचा संदेश यामधून देण्यात आला.
सुमारे 50 हून अधिक एनसीसी छात्रा या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. ही रॅली फातिमा कॅथेड्रल चर्च, केंद्रिय विद्यालय हायस्कूल, शौर्य चौक येथून तीन किलोमीटरपर्यंत जाऊन पुन्हा कॉलेजजवळ सांगता झाली. प्राचार्य मेरी अब्राहम, इव्हेंट सहायक अश्विनी आंबेकर, सायकल रॅलीचे नेतृत्व करणारे प्रकाश सोनवलकर, पीटीए मेंबर चेतन रजपूत, विरेंद्र महाजन, म्यान्युअल डिक्रुज, परवेज किणीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta