‘नवहिंद क्रीडा केंद्रा’च्या बौद्धिक स्पर्धा उत्साहात संपन्न
येळ्ळूर : ‘युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा उद्योग उभारून रोजगार निर्माण करावा व राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा’, असे प्रतिपादन युनियन बँक येळ्ळूरचे मुख्य प्रबंधक श्री. अभिजित सायमोते यांनी केले. ते नवहिंद क्रीडा केंद्राने आयोजित केलेल्या बौध्दिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव सायनेकर होते.
बौद्धिक स्पर्धांचे उद्घाटन करताना प्रसिद्ध उद्योजक आणि मराठा मंदिरचे अध्यक्ष श्री. आप्पासाहेब गुरव यांनी ‘नवहिंद’ने ३९ वर्षे अखंडपणे स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला आहे. यापुढील काळात असेच कार्य ‘नवहिंद’कडून अपेक्षित असल्याचे सांगितले.
प्रारंभी सेक्रेटरी आनंद पाटील यांनी इशस्तवन सादर केले. छ. शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन अभिजित सायमोते यांनी केले.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नवहिंद मल्टीस्टेटचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, न्यू नवहिंद मल्टीपर्पजचे चेअरमन नारायण जाधव, प्रियदर्शनी नवहिंद महीला सोसायटीच्या चेअरमन माधुरी पाटील, नवहिंद महिला प्रबोधन संघाच्या अध्यक्षा निता जाधव उपस्थित होत्या.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे अनुक्रमे प्रथम – व्दितिय – तृतिय
भाषण (प्राथमिक)
१) भुमि म्हात्रू भातकांडे, २) पूर्वी रमेश घाडी, ३) हर्ष गावडू पाटील
माध्यमिक
१) विद्या गोविंद चव्हाण, २) वैजनाथ शरद पाटील, ३) लक्ष्मी श्रीधर पाटील
गायन (प्राथमिक)
१) ग्रंथा परशराम गुरव, २) पद्मश्री सुतार, ३) पूजा मंगेश सायनेकर
(माध्यमिक)
१) राधिका बाळकृष्ण कंग्राळकर, २) प्रणिती विनय संभाजी, ३)
शिवाणी नंदकुमार पाटील
बुद्धीबळ (प्राथमिक)
१) रितेश मुचंडीकर, २) अनिकेत हलगेकर
(माध्यमिक)
१) सृजन राजू कांबळे, २) अमृत रामा मोटणकर
रांगोळी (१ ते ४ थी)
१) आयूशी राजेद्र नायकोजी, २) स्वरा काटकर, ३) आदिती अवधूत लोहार
प्राथमिक (५ ते ७ वी)
१) पूजा पुंडलिक देसाई, २) राजनंदीनी महेश जाधव, ३) वैष्णवी राजू सांबरेकर, ४) सृष्टी रवि पत्तार, ५) श्रध्दा रामू कोकीतकर
(माध्यमिक)
१) मेघना महादेव घाडी, २) साक्षी सागर किल्लेकर, ३) श्रेया मोहन घोळसे, ४) नंदीनी विनायक सांळूखे, ५) प्रज्योती अनिल पाटील
सदरी स्पर्धेत ४०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
विजेत्या स्पर्धकानां मान्यवराच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी नवहिंद क्रीडा केंद्राचे कार्यकर्ते, नवहिंद प्रबोधन संघाच्या कार्यकर्त्या, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचन अनिल हुंदरे व आभार हणमंत पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta