बेळगाव : बेळगावात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना जास्त प्रमाणात घडत आहेत. प्रेमाला नकार दिल्याने संतप्त तरुणाने नर्सवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बेळगावात 30 ऑक्टोबर रोजी घडली होती. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने आज उघडकीस आली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, बेळगावातील एका खासगी रुग्णालयातील नर्सने प्रेमाला नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने तरुणीवर 30 ऑक्टोबर रोजी चाकूने हल्ला केला होता. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.
सदर आरोपी तरुण हेल्मेट घालून रुग्णालयात आला. प्लॅस्टिकच्या आवरणात आणलेल्या चाकूने त्याने नर्सवर हल्ला केला. सदर रुग्णालयातील रुग्ण घाबरून पळून गेले. प्रकाश जाधव हा नर्सच्या प्रेमात पडला होता आणि त्याने लग्नाचा हट्ट धरला होता. असे म्हटले जाते की तिने कुटुंबाला घरी नेले आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तरुणीला हे मान्य नव्हते. याच कारणावरून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच बेळगाव खडेबाजार पोलीस ठाण्याने रुग्णालय गाठून आरोपीला अटक केली.
Belgaum Varta Belgaum Varta