बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हालभावी येथे संघाकडून कर्ज घेऊन तब्बल ३० हजारांहून अधिक महिलांची फसवणूक करणाऱ्या महिलेच्या घरावर छापा टाकण्यात आला.
बेळगाव तालुक्यातील हालभावी गावातील सुरेखा हळवी नामक महिलेने तब्बल ३० हजारांहून अधिक महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. सुरेखा यांनी काही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये महिलांच्या संघटना स्थापन करण्यास प्रवृत्त करून या महिलांच्या नावे सोसायटी फायनान्स आणि असोसिएशनकडून ५० हजारांचे कर्ज घेऊन त्यांना २५ हजार रुपये देऊन स्वत:साठी २५००० ठेवल्याचे सांगून फसवणूक केल्याचा आरोप पुढे आला आहे. महिलांकडून मिळालेल्या पैशातून सुरेख हळवी नामक महिलेने अमाप पैसा आणि संपत्ती जमविल्याची माहिती पुढे आली असून संतप्त महिलांनी सुरेखा हळवी यांच्या घराला घेराव घातला.येथील परिस्थितीचा अंदाज येताच काकती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर डीसीपी रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरेखा हळवी यांना वर्षभराचा वेळदेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.