Friday , March 6 2026
Breaking News

सोशल मीडियावर मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी करणारा आरोपी अटकेत

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावर सोशल मीडियावर अवमानजनक भाषा वापरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला तुमकूरमधून अटक करून बेळगाव कोर्टात हजर करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविरोधात निंदनीय आणि अवमानजनक भाषेत टिप्पणी करणाऱ्या मोहित नरसिंहमुर्ती (38) या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात बेळगावच्या मार्केट पोलिस ठाण्यात मंत्री सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय विजय तळवाळ यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मार्केट पोलिसांनी तपास करत आरोपीला तुमकूर येथे शोधून काढत अटक केली. त्यानंतर आरोपीला बेळगाव येथे आणून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे सोशल मीडियावरील बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या नेटकऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *