Friday , March 6 2026
Breaking News

प्रेम विवाह नाकारल्याच्या रागातून दोघांची हत्या

Spread the love

 

निपाणी : प्रेम नाकारल्याचा राग मनात धरून तरुणाने प्रेम करणाऱ्या मुलीच्या आईची व तिच्या भावाची हत्या केल्याची घटना निपाणी तालुक्यातील अकोळ गावात घडली. मंगला नाईक (45) आणि प्रज्वल नाईक (18) अशी हत्या झालेल्याची नावे आहेत. निपाणी तालुक्यातील अकोळ गावातील एका घरात बुधवारी रात्री घडलेल्या घटनेने लोक हादरून गेले.

रवीने हा गुन्हा केल्याची माहिती आहे. त्याचे एका तरुणीवर प्रेम होते. पण त्याच्या घरच्यांचा त्याच्या प्रेमाला खूप विरोध होता. लग्नाला कोणत्याही कारणास्तव संमती न मिळाल्याने ही हत्या झाल्याचा संशय आहे

या घटनेसंदर्भात आरोपी रवी आणि खून झालेल्या मंगला यांच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, निपाणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बेळगावात उद्या कवी संमेलन

Spread the love  बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने मराठी भाषा गौरव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *