बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय येथे युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या विरुद्ध महामेळाव्याचे आयोजन सोमवार ९ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. सदर महामेळावा यशस्वी करण्याचा ठराव संमत करण्यात आला आणि सदर महामेळाव्याला मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकत दाखवावी असे आवाहन युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले.
बैठकीला कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, खजिनदार विनायक कावळे, समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत दांडेकर, अश्वजीत चौधरी, सुरज कुडूचकर, आशिष कोचेरी, निखिल देसाई, प्रतीक पाटील, आनंद पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta