बेळगाव : बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने “मि. बेळगाव-2024” जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शनिवार 28 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4.00 वाजता धर्मवीर छ. श्री संभाजी मैदान, महाद्वार रोड, बेळगाव येथे या स्पर्धा भरविण्यात येणार आहेत.
“मि. बेळगाव-2024” स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम ते पाचव्या स्थानावर येणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे रु. 5000/-, रु. 4000/-, रु. 3000/-, रु. 2000/- आणि रु. 1500/- दिले जातील. तसेच, “मि. बेळगाव-2024” विजेत्याला रु. 11,000/- आणि उपविजेत्याला रु. 7000/- रोख राक्का, पुरस्कार, पदक, प्रमाणपत्र, आकर्षक पारितोषिक आणि सॅश बेल्ट देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीकरिता अनील आम्बरोळे 9342462306, राजेश लोहार: 89715 97642, विजय चौगुले: 9964780696 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांनी स्पर्धेच्या नियम व अटींचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्पर्धकांना अयोग्य ठरवले जाईल, असे कळविण्यात आले आहे.