बेळगाव : रात्रीच्या वेळी मोबाईल शॉपचे लोखंडी रॉडने शटर कट करुन, दुकान उघडुन आत घूसुन 13 मोबाईलची धाडसी चोरी केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
याप्रकरणी तिसरे जे. एम. एफ. सी न्यायालयाने निकाल सुनावला असून साक्षीदारातील विसंगती व सबळ पुराव्या अभावी आरोपी अतीक महम्मबहुसेन पटेल, वय 24 वर्षे, राहणार : चिराग नगर, बेळगांव याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
खडे बजार पोलिसात फिर्यादी अरुण सुब्रमणम गौडर यांनी त्यांच्या श्री लक्ष्मी मोबाईल सेल्स आणि सर्व्हिस शॉप येथे चोरी प्रकरणी भा. दं. वि. कलम 457, 380 कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात खडेबाजार पोलिसानी तपास चालु केला. तपासादरम्यान आरोपी अतिक हा ह्या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचे दिसुन आले. त्यानंतर सदर आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर खडेबाजार पोलिसाचे पि. एस. आय व्हि. एन. पाटील यांनी खटल्याचा पुर्ण तपास करुन न्यायालयात आरोपीविरोधात दोषारोप दाखल केले.
न्यायालयात 7 साक्षिदार 25 कागदोपत्री पुरावे व दोन मुद्देमाल तपासण्यात आले. मात्र साक्षीदारांच्या विसंगतीमुळे तसेच सबळ पुराव्याअभावी आरोपीची मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने ऍड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.