Friday , March 6 2026
Breaking News

हिंडलगा कारागृहातील कैद्याचा संशयास्पद मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : हिंडलगा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बन्नंजे राजाच्या एका साथीदाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. कैद्याचे नाव के. एम. इस्माईल असून, उद्योजक आर. एन. नायक हत्या प्रकरणात त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. हिंडलगा कारागृहात मागील 9 वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला के. एम. इस्माईल याला आज अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी तातडीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयाकडे जातानाच त्याचा मृत्यू झाला. इस्माईल याला यापूर्वी दोनदा हृदयविकारासंबंधित उपचार करण्यात आले होते. सध्या त्याचा मृतदेह बीम्स शवागारात ठेवण्यात आला आहे. केरळमधील कासरगोड येथील रहिवासी असलेल्या इस्माईल याच्या कुटुंबीयांचे आगमन होईपर्यंत शवविच्छेदन होणार नाही. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही घटना बेळगाव एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *