बेळगाव : मूळचे रामलिंग खिंड गल्लीचे रहिवासी सध्या महात्मा फुले रोड येथे वास्तव्यात असलेले सामाजिक कार्यकर्ते संजय किल्लेकर (वय 55) यांचे शनिवारी रात्री आकस्मित निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा मोठा परिवार आहे. रविवारी सकाळी 11 वाजता शहापूर स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहेत. संजय किल्लेकर धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते होते. त्यानी काँग्रेस पक्षासाठी देखील बेळगाव शहरात मोठे योगदान दिले होते. सुरुवातीच्या काळात सेवा दल नंतर काँग्रेसमध्ये ते कार्यरत होते अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा.