बेळगाव : कन्यकंबा वैश्य युवती संमेलन श्री. संस्थान शांताश्रम कुलगुरू मठ काशी व हळदीपूर यांच्या विद्यमानाने दि. ७ व रविवार दि. ८ डिसेंबर रोजी वैश्य समाजातील १५ ते ४० वयोगटातील महिला व युवतींसाठी अखिल कर्नाटक कंन्यकांबा युवती संमेलन श्री. चिदंबरदास राजाराम महाराज पांडुरंग महाराज समाधी (शाखा मठ) गोवावेस बेळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला प्रमुख पाहुण्या म्हणून ‘अंकुर’ संस्थेच्या संस्थापिका गायत्री गावडे उपस्थित होत्या. वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, युवा संघटना अध्यक्ष रोहन जुवळी, महिला मंडळ अध्यक्षा अंजली किनारी, शाखा मठ अध्यक्ष समीर अनगोळकर, तसेच कन्याकांबा कमिटी अध्यक्षा वैशाली पालकर, उपाध्यक्षा शुभांगी देवलापूरकर, खजिनदार अक्षता कलघटगी, सेक्रेटरी लक्ष्मी बिडीकर, उपसेक्रेटरी प्रणाली कपिलेश्वरी उपस्थित होत्या. संमेलनाची सुरुवात स्वागत गीत, दिप प्रज्वलन तसेच श्री समादेवी आणि श्री वामनाश्रम फोटोच्या पूजनाने झाली. शारदा काणेकर यांनी कन्यकांबा संमेलनाचे महत्त्व विशद केले. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मठाच्या वतीने समीक्षा फायदे, अंजली शेठ, शोभा शेट्टी, श्री. सुदर्शन प्रभू, आहारतज्ञ डॉ. सोनाली पावले, अनिता कणबर्गी यांनी मार्गदर्शन केले
या संमेलनामध्ये भाषण, चर्चासत्र, गीता पठण, नृत्य स्पर्धा, अग्निविरहित पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. या शिबिराला सत्तरहून अधिक शिबिरार्थीचा सहभाग लाभला. या कार्यक्रमासाठी डॉ. प्रियांका मुरकुंबी आणि आणि राधिका कोरगावकर यांनी सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैश्य समाजातील कार्यकारिणील सदस्य/सदस्या यांनी खूप परिश्रम घेतले.