Thursday , December 12 2024
Breaking News

दोन दिवसीय आंतरशालेय वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महोत्सव “रेजोनन्स” मोठ्या उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : एस के ई सोसायटी संचलित जी एस एस पदवीपूर्व महाविद्यालय बेळगाव येथे (दिनांक 7 व 9 डिसेंबर 2024) महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दोन दिवसीय आंतरशालेय वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महोत्सव “रेजोनन्स”चा निरोप (सांगता) समारंभाचे आयोजन आज रोजी करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कर्नल चंद्रनील पी रामणाथकर (एम एल आय आर सी) बेळगाव आणि अध्यक्ष एस के ई सोसाइटीचे व्हाईस चेअरमन श्री. एस वाय प्रभू उपस्थित होते.

कर्नल चंद्रनील पी रामणाथकर मूलतः मिलीटरी परिवारात वाडलेले, त्यांनी ही आपला ध्येय राष्ट्र सेवेचा ठेवला आणि आज 24 वर्षाची प्रदीर्घ सेवा त्यांनी देशासाठी दिली, त्याची कर्तव्यनिष्ठ, कार्य क्षमता, आणि निस्वार्थ सेवा पहाता अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात त्यांनी आपली सेवा बजावली. इंडियन मिलीटरी अकादमी, आर्मी वार काॅलेज, सध्या एम.एल.आय. आर.सी. बेळगाव येथे डेप्युटी कमांडण्ट आणि प्रशिक्षण समुहाचे प्रमुख आहेत.

या कार्यक्रमास व्यासपीठावर जी.एस. एस पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. देसाई, एस के ई सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री. एस वाय प्रभू , कर्नल चंद्रनील पी रामणाथकर, रेजाॅनन्स महोत्सवाचे संचालक प्रा. प्रवीण पाटील, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. अनिल खांडेकर, जनरल सेक्रेटरी कुमार निरंजन चिंचणीकर आणि विद्यार्थ्यीनी प्रतिनिधी कुमारी तनिष्का विल्सन उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कु. पावनी ऐरसंग हिच्या स्वागत गीताने झाली.

उपस्थित मान्यवर, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि स्पर्धेकांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य एस एन देसाई यांनी केले. प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांचा परिचय प्रा. डॉ. किर्ती व्ही फडके यांनी प्रस्तुत केला. प्रमुख पाहुणे कर्नल चंद्रनील रामनाथकर यांचे स्वागत, श्री. एस वाय प्रभू यांनी मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले, अध्यक्ष श्री. एस वाय प्रभू यांचे स्वागत प्राचार्य एस एन देसाई यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल चंद्रनील पी. रामनाथकर यांनी आपले मौलिक विचार व्यक्त करतेवेळी एस के ई सोसाइटीचे सदस्य आणि जी एस एस काॅलेजचे प्राचार्य व प्राध्यापक यांचे अभिनंदन केले कि आजच्या स्पर्धात्मक युगात अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करणे गरजेचे आहे, अभ्यासाव्यतरिक्त विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना उजाळा देण्याची संधी प्राप्त होते आणि आज हे सुप्त कार्य येथे संपन्न झाले आहे. दोन दिवस विद्यार्थी आणि शिक्षक यांचे कार्य यशाच्या आणि ज्ञानाच्या क्षमतेची साक्ष देत आहे या दोन दिवसाच्या महोत्सवात अनेक शालेय विद्यार्थ्यानी सहभाग घेतला प्रत्येकाला विजय प्राप्त झालेला नाही पण कोनी एक विजेता होण्यासाठी स्पर्धक हे हवेतच स्पर्धकांची जितकी संख्या जास्त तितके स्पर्धेचे महत्व आणि स्पर्धेकांची पराकाष्ठा दिसून येते आज आपण सर्व सहभागी झाला आणि या महोत्सवासाठी प्रोत्साहन देण्याचे सुप्त कार्य केला, आपल्या सर्वाना भाविभविष्यासाठी शुभेच्छा देत या पूर्ण महोत्सवाच्या आयोजनासाठी सहभागी, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्गाचे अभिनंदन करत प्रत्येक विद्यार्थ्यी स्पर्धकास वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एस वाय प्रभू यांनी अध्यक्षीय भाषणात दोन दिवस चाललेल्या या महोत्सवासाची तैयारी कमी वेळेत मोठ्या प्रमाणात केली, ईतका मोठा उपक्रम विद्यार्थी वर्गाने राबवला यासाठी आवश्यक ते सहकार्य प्राचार्य व प्राध्यापक वर्गाने केले या सर्वांचे आणि स्पर्धेकांचे अभिनंदन केले.

दोन दिवस चाललेल्या रेजोनन्स या महोत्सवाचा अहवाल विस्तारीत रूपात आणि सर्व शालेय स्पर्धक, शिक्षक, आयोजक, प्राध्यापक यांचे आभार प्रा. प्रवीण पाटील यांनी मानले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध शालेय विद्यार्थी वर्गाने दोन दिवस चाललेल्या या महोत्सवासाठी ट्रेझर हंट, व्हिडिओ ग्राफी, नृत्य, गायन, विज्ञानातील नमुने, पथ नाट्य,अद्भूत खेळ, विज्ञान प्रश्न मंजुषा, यांत्रिकी मानव स्पर्धा, विज्ञान फॅशन शो, छायाचित्र स्पर्धा, डॉकुमेन्ट्री(माहिती पट), कला, एकपात्री अभिनय, व्यंग, निवडा आणि बोला, मेंटर चॅलेंज, आशा स्पर्धाचे विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

संस्कृती कार्यक्रमात महाविद्यालयच्या विद्यार्थी वर्गाने गायन, नृत्य प्रस्तुत केले. रेजोनन्स या कार्यक्रमाबद्दल विविध शालेय विद्यार्थी आणि शिक्षकानी आपले मनोगत व्यक्त केले.

स्पर्धेतील उत्कृष्ट विजेते पद डीव्हाईन प्रोव्हीडन्स शाळेने पटकावले ( जनरल चॅम्पियन शिप) तर उपविजेतेपद ब्लुमींग बर्ड शाळेने पटकावले. याची घोषणा प्राचार्या एस एन देसाई यांनी केली.
उपस्थितांचे, प्राध्यापक, प्रमुख पाहुणे, स्पर्धक,विद्यार्थी प्रतिनिधी यांचे अभार प्रा. अनिल खाण्डेकर यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कुमारी जोया इनामदार आणि कुमार सोहम शहापूरकर यांनी केले.

आयोजीत कार्यक्रमास बहुसंख्येने शालेय विद्यार्थ्यानी सहभाग घेतला आहे, या दोन दिवशीय महोत्सवात 18 (अठरा) स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात एम व्ही हेरवाडकर,ठळकवाडी हायस्कूल, बालीका आदर्श, के.एल.एस., डीपी., सेंट पॉल स्कूल, ब्लुमींग बर्ड स्कूल, स्वाध्याय विद्या मंदिर, शानभाग स्कूल आशा अनेक शाळेच्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.
या पूर्ण महोत्सवाचे वैशिष्ट्य, पूर्ण नियोजन आणि रुपरेखा प्राचार्य, प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीवर्गाने आखली आहे.
या निरोप समारंभास विविध शाळेंचे शिक्षक विद्यार्थी आणि जी एस एस पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

53 वा वार्षिक अय्यप्पा स्वामी महोत्सव 22 डिसेंबरपासून

Spread the love  बेळगाव : श्री अय्यप्पा सेवा समिती ट्रस्ट, आश्रय कॉलनी नानावाडी, बेळगाव यांच्यावतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *