बेळगाव : मूळचे गोंधळी गल्ली व सध्या शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथील रहिवासी आणि मराठा मंडळ हायस्कूलचे निवृत्त शिक्षक अशोक आप्पाजी अनगोळकर (वय ८६) यांचे आज बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. उद्या गुरुवारी सकाळी ९ वाजता सदाशिवनगर येथे अंत्यविधी होणार आहे.