Saturday , December 14 2024
Breaking News

तालुका समितीचे ज्येष्ठ नेते कृष्णा हुंदरे यांचे निधन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, माजी तालुका पंचायत सदस्य कृष्णा ना. हुंदरे (वय 70) रा. हंगरगा यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 5 विवाहित मुली, एक मुलगा, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार रविवारी दुपारी 12 वाजता हंगरगा येथे होणार आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बुलंद आवाज हरपला अशी भावना कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे. तालुका समितीच्या अनेक सभा बैठका त्यांनी गाजवल्या होत्या. सीमा प्रश्नासाठी अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

About Belgaum Varta

Check Also

क्षयरोगमुक्त भारत निर्माण करूया : संजीवीनी फौंडेशनचे सीईओ मदन बामणे

Spread the love  क्षयरोगमुक्त भारत या केंद्र सरकारच्या मोहिमेची संजीवीनी फौंडेशन येथून सुरुवात बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *