Sunday , December 15 2024
Breaking News

महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ नागपूर हिवाळी अधिवेशनात धडकणार!

Spread the love

 

बेळगाव : नागपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्नी पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ व कार्यकर्ते दि. 17 डिसेंबर रोजी नागपूरला धडकणार आहे.
महाराष्ट्र मागील तीन वर्षात आपल्याच सत्ता संघर्षात अडकून पडला होता. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे सीमालढ्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मात्र सध्या महाराष्ट्राला एक स्थिर सरकार मिळाले असल्यामुळे आता तरी हे नवीन सरकार सीमाप्रश्नाकडे गांभीर्याने बघेल यासाठी योग्य तो पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेऊन सीमाप्रश्नासंदर्भाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
समितीने नेते रणजीत चव्हाण पाटील यांच्या नेतृत्वाखाली रमाकांत कोंडूस्कर, महादेव पाटील, सागर पाटील, प्रा. आनंद आपटेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नागपूर मुक्कामी आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनात दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास परवानगी नाकारून कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवर दडपशाही केली आहे. या कृतीचा निषेध करण्यासाठी समितीचे शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे आणि पंतप्रधानांकडे पाठपुरावा करणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांनी एकत्र येऊन गृहमंत्री व पंतप्रधानांची भेट घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीतून निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांना सीमाप्रश्नाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न नागपूर दौऱ्यात केला जाणार आहे. नागपूर येथे होणाऱ्या या आंदोलनात चंदगडचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन समिती नेत्यांना दिले आहे. इच्छुक कार्यकर्त्यांनी नागपूर अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सागर पाटील 9964777565, महादेव पाटील 9481535528 तसेच प्रा. आनंद आपटेकर 9880131123 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीचे ज्येष्ठ नेते कृष्णा हुंदरे यांचे निधन

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, माजी तालुका पंचायत सदस्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *