Sunday , December 15 2024
Breaking News

अबकारी खटल्यातून दोघांची निर्दोष मुक्तता

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नंदीहळ्ळी येथील घटनेत अबकारी खटल्यातुन आरोपींची सबळ पुराव्या अभावी व साक्षिदारातील विसंगतीमुळे येथील तिसरे जे. एम. एफ. सी न्यायालयाचे न्यायाधीशानी आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

1) संतोष रायाप्पा चौगुले वय 24 वर्षे, धंदा शेती, राहणार शिवाजी नगर, नंदीहळ्ळी, ता. जि. बेळगांव
2) रायाप्पा शिवाजी चौगुले वय 50, धंदा शेती, राहणार शिवाजी नगर, नंदीहळ्ळी, ता. जि. बेळगांव अशी यातून निर्दोष झालेल्यांची नावे आहेत.

अबकारी साऊथ सब डिव्हीजन बेळगांव येथील फिर्यादी प्रेमसिंग एस. लमाणी अबकारी अधिकारी व तपास अधिकारी एस. एस. मुजावर अबकारी उप.निरिक्षक यांनी दाखल केलेल्या दोषारोप प्रकारे दिनांक 04/03/2019 रोजी ऑफीसमध्ये असताना खात्रीवायक बातमी मिळाली त्यानंतर पोलीस जिप घेवुन दुपारी 2.30 वाजता अबकारी पोलिस स्टाफ व कोन पंचाना घेवुन नंदीहळ्ळी गावातील ग्राम पंचायतीजवळ अबकारी गस्त घालत असताना त्यावेळी खात्रीदायक बातमी आल्याच्या बातमीवरुन नंदिहळ्ळी गावातील शिवाजीनगर येथील आरोपी संतोष रायाप्पा चौगुले याच्या घरामध्ये जावुन शोध करुन घराचा तपास करत गेल्यानंतर घरातील स्वयंपाक खोलीमध्ये डायनिंग टेबलच्या खाली प्लॅस्टीक ट्रेमध्ये गोवा राज्यात विकण्यासाठी मात्र असा लेबल असलेली दारु आणि गोवा बिअर टीन संग्रह करुन ठेवला होता. त्या ट्रेमध्ये 21 लिटर गोवा बारु व 24 लिटर गोव्याची बिअर त्याच्यात होती. सबरी आरोपीने अबकारी कायदे 1965 कलम 13 अ, 14, 15 32 (1) 34,38 (1) व 43 (२) प्रकारे कायद्याचा उल्लंघन केला म्हणुन तिथेच जागावरच मुद्देमालाचा पंचासमक्ष पंचनामा करुन सबरी दारु व बिअर पंचासमक्ष जप्त करण्यात आली.

व सबरी आरोपीला तिथेच अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर घर व घरातील विजेचे मिटर कोणाच्या नावावर आहे हे तपास केले असता सदरी घर व घरातील लाईट बील मिटर हे आरोपी रायाप्पा शिवाजी चौगुले यांच्या नांवावर नोंदणी आहे. असे समजले त्यामुळे सदरी रायाप्पा ह्याना ही या केस मध्ये आरोपी करण्यात आले. त्यानंतर सबरी खटल्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले होते. आरोपीच्या वतीने ऍड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीचे ज्येष्ठ नेते कृष्णा हुंदरे यांचे निधन

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, माजी तालुका पंचायत सदस्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *