बेळगाव : शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर व शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 या दोन दिवसात मराठी विद्यानिकेतन शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पाडला.
क्रीडा महोत्सव उद्घाटनासप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केदनूर माध्यमिक शाळेचे क्रीडाशिक्षक आर. एन. पाटील सर उपस्थित होते.
सर्वप्रथम पाहुण्यांचे क्रीडांगणामध्ये आगमन त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक यांची उडकेकर गजानन सावंत व शिक्षण संयोजक निला आपटे यांच्यातर्फे पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेचे क्रांती, ज्योती, प्रगती आणि भारती गटाने पाहुण्यांना मानवंदना दिली. क्रीडा ज्योतीचे आगमन राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंच्या हस्ते क्रीडांगणात करण्यात आले.
ऐश्वर्या कंग्राळकर हिने खेळाडूंना खिलाडूवृत्ती ची शपथ दिली. त्यानंतर प्रमुख पाहुणे आर. एन. पाटील सरांनी मुलांना खेळाविषयी उत्तम मार्गदर्शन केले व स्वताचे अनुभव सांगितले त्याचबरोबर वार्षिक स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
क्रीडा महोत्सवी च्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक नारायण उडकेकर, गजानन सावंत, शिक्षण संयोजक निला आपटे, क्रीडा शिक्षक महेश हगीदळे, दत्ता पाटील, पूजा संताजी, श्रीधर बेन्नाळकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन प्रतिभा मसुरकर यांनी केले व आभार पूजा संताजी यांनी मानले.