बेळगाव : बेळगाव येथील खंजर गल्लीत काल रात्री अचानक आग लागून एका दुचाकीसह 5 दुकाने जळून खाक झाली.
नगरसेवक मुजम्मील ढोनी यांनीही भेट देऊन अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिस, महापालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.