बेळगाव : शेतकऱ्यांना मारक ठरणारे तिन्ही कायदे रद्द करा, स्वामीनाथन आयोग अमलात आणा, ऊसाला 4500 रु. भाव द्या, विद्युत खासगीकरण थांबवा, बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास रद्द करा, बळ्ळारी नाल्याची साफसफाई करुन परिसरातील शेतकऱ्यांना वाचवा, गेल्या वर्षीपेक्षा भाताला 1500/2000 रु.भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान थांबवत भाव वाढवत सरकारने भात, सोयाबिन इतर खरेदी केंद्र स्थापन करा यासह शेतकऱ्यांना मारक ठरणाऱ्या इतर अटी रद्द करुन कर्नाटकात शेतकऱ्यांनी सत्तेवर बसवलेल्या सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा खुर्च्या खाली करा, असे राज्य नांगरधारी शेतकरी संघटनेतर्फे अलारवाड रस्त्यापासून मंडप नं. 6 पर्यंत शेतकरी पायी चालत घोषणा देत शेतकरी व महिला आंदोलनस्थळी पोहोचल्या.
यावेळी राज्य नांगरधारी शेतकरी संघटना अध्यक्ष रवी पाटील, कार्यदर्शी कल्लाप्पा रपाटी यांच्यासह सर्व जिल्ह्यातील संघटनेचे शेतकरी, कार्यकर्ते, महिला शेतकरी मोठ्या संखेने हजर होते.
Belgaum Varta Belgaum Varta