खानापूर : खानापूर तालुक्यातील माण गावातील रहिवासी सखाराम गावकर हे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी होऊन त्यांचा पाय पूर्णतः निकामी झाला आहे. याची सरकारने दखल घेऊन वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी शासनाच्या वतीने 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली.
सखाराम गावकर यांच्यावर सध्या बेळगाव येथे उपचार सुरू आहेत. सुरवातीला माणच्या ग्रामस्थांनी घरोघरी जावून वर्गणी जमा करून सखाराम गावकर यांच्यावर उपचार सुरू केले होते तसेच खानापूर वन अधिकाऱ्यांनी शासकीय मदत मिळाल्यानंतर परत देण्याच्या अटीवर जुजबी मदत केली असल्याची बाब देखील पुढे आली आहे. सखाराम गावकर हे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाल्याची बातमी समजताच खानापूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष आय. आर. घाडी यांनी जखमीची चौकशी करत स्वतः 5 हजारांची मदत देवू केली होती आणि खानापूर तालुक्याच्या माजी आमदार व एआयसीसी सचिव डॉ.अंजली निंबाळकर यांच्या निदर्शनास सदर बाब आणून देताच डॉ.अंजली निंबाळकर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून जखमी शेतकऱ्याला शासकीय मदत मिळवून दिली.
Belgaum Varta Belgaum Varta