बेळगाव : येथील मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. 2025 ते 2030 या काळासाठी झालेल्या या निवडणुकीत विद्यमान पॅनल निवडून आले. त्यानंतर सोसायटीच्या चेअरमन व्हा. चेअरमनपदी श्री. संजय मोरे यांची तर व्हाईस चेअरमनपदी रमेश ओझा यांची फेरनिवड करण्यात आली
संचालक म्हणून प्रसन्ना रेवन्नावर, राजेंद्र अडुरकर, किशोर भोसले, सदाशिव कोळी, जयपाल ठकाई, शारदा सावंत, सविता कणबरकर, मयूर सुळगेकर व अतुल कपिलेश्वरी यांची निवड करण्यात आली.
30 नोव्हेंबर 2024 अखेरीस संस्थेचे भाग भांडवल 1 कोटी 45 लाख असून ठेवी 71 कोटी 34 लाख आहेत तर 66.04 कोटीचे कर्ज वितरण केले आहे. गुंतवणूक 23.75 कोटी, खेळते भांडवल 95 कोटी, वार्षिक उलाढाल 202 कोटीची झाली आहे.