

बेळगाव : ज्युनियर मि. इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत बेळगावच्या दोन शरीरसौष्ठवपटूनी घवघवीत यश संपादन केले आहे. कुचबिहार या ठिकाणी नुकताच 57 व्या ज्युनियर राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.13 राज्यातून जवळपास 97 बॉडी बिल्डिंग स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
पश्चिम बंगालच्या अंकुश गुहा याने आपल्या पिळदार शरीराचे दर्शन घडवत ज्युनियर मिस्टर इंडिया हा किताब पटकावला.
कर्नाटक राज्य संघातून खेळताना बेळगावच्या 65 किलो वजनी गटात ऋतिक पाटील आणि 75 किलो वजनी गटात सुजित शिंदे यांनी सुवर्ण पदकाची कमाई करत बेळगावचे नाव उज्वल केले आहे.
कर्नाटक कडून 60 किलो वजनी गटात यश हुल याने पाचवा क्रमांक मिळवला. कर्नाटक संघाचे नेतृत्व श्रीधर बारटक्के यांनी केले होते. मास्टर मिस्टर इंडियाचा किताब आसामच्या दिलीप दिओरी यांनी पटकाविला आहे.
बेळगावच्या यश मिळालेल्या स्पर्धकांना बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta