
बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) यांच्यावतीने श्रीमती सोनाबाई मांगीलाल सामसुखा हेल्थकेअर प्रस्तुत व के.एल.ई. संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय नेत्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र रोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हलगा येथे मंगळवार दिनांक २४ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता येथील बस्ती गल्लीतील श्री १००८भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन बस्ती आवारात हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या नेत्ररोग शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जितो या संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.या शिबिराबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जीतो चे कार्यकारी सदस्य सुहास सैब्बण्णावर ९०६०००१००८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जीतो संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta