
बेळगाव : अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवार दि. ५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक येथे उभारण्यात आलेल्या शिवशंभूतीर्थ स्मारकाचे अनावरण व प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी अनगोळ भागातील शिवप्रेमींची महत्त्वाची बैठक रविवारी आदिनाथ भवन मंगल कार्यालय, वाडा कंपाऊंड येथे झाली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित करण्याचा तसेच अनगोळ नाका येथून मिरवणुकीला सुरुवात करणे, ढोल-ताशा पथक, मर्दानी खेळ, आकर्षक विद्युत रोषणाई, घोडे, हत्ती, सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta