Friday , March 6 2026
Breaking News

बिजगर्णी हायस्कूलमध्ये निवृत्त हवालदार मेजर उत्तम जो. मोरे यांचा सन्मान

Spread the love

 

बिजगर्णी : बिजगर्णी हायस्कूलच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न. या क्रीडा महोत्सवचे उद्घाटन निवृत्त जवान उत्तम जोतिबा मोरे यांच्या हस्ते श्रीफळ, ध्वजारोहण करून करण्यात आले. सावित्री फुले फोटो पूजन मनोहर बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. खो – खो मैदानाच पूजन सागर नाईक यांच्या हस्ते, कब्बडी मैदानाचे पूजन श्रीफळ वाढवून ग्राम पंचायत सदस्य संतोष कांबळे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वार्षिक क्रीडा महोत्सवचे थाटात उद्घाटन करण्यात आले.
खो- खो, कब्बडी, हाॅलिबाॅल या सांघिक खेळांच्या स्पर्धा घेऊन सुरूवात झाली. अध्यक्षस्थानी के. आर. भास्कर होते.यावेळी उत्तम जोतिबा मोरे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रशालेला संपूर्ण लागणारे क्रीडा साहित्य देण्याचं आश्वासन उत्तम मोरे यांनी दिलं. शाळेला सर्वातोपरी आर्थिक सहकार्य करुन, विकास साधण्यासाठी एकत्रितपणे कार्य करुया असे विचार व्यक्त केले. मनोहर बेळगावकर व संतोष कांबळे यांनी इ.दहावी उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकाना रक्कम स्वरूपात बक्षीस जाहीर केले. पंच म्हणून दरेकर ए. एम. यांनी काम पाहिले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रमेश कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन आरती सरवणकर, आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक दरेकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *