बेळगाव : सावगावच्या तलाठ्यांनी जिवंत व्यक्तीची मृत अशी नोंद केल्याने सदर व्यक्तीचे आधारकार्ड ब्लॉक झाले आहे. जिवंत असूनदेखील सरकारी सुविधांपासून हे वंचीत आहेत. तलाठ्याच्या निष्काळजीपणाचा फटका सहन करणाऱ्या व्यक्तीने न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
बेळगाव तालुक्यातील सावगाव गावात आजोबांचा मृत्यू दाखला देण्याऐवजी गावातील तलाठ्यांनी नातवाला मृत घोषित केले. त्यामुळे जिवंत नातवाला शासकीय लाभापासून वंचित राहावे लागत आहे. सावगाव येथील गणपती खाचू काकतकर हे त्यांचे मयत आजोबा मष्णू शेट्टू काकतकर यांचे जमिनीच्या संबंधात मृत्यू प्रमाणपत्र घेण्यासाठी गेले असता, गावातील लेखापालांनी आधारकार्डच्या कागदपत्रासह आजोबांऐवजी जिवंत नातवाचा मृत्यू झाल्याची नोंद केली. तलाठ्याच्या या निष्काळजीपणामुळे त्यांना सर्व शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. गणपत काकतकर यांनी न्यायासाठी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.