बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीतर्फे आयोजित सैन्यात निवड झालेल्या बेळगाव तालुक्यातील युवक – युवतींचा सत्कार समारंभ आज बुधवारी दुपारी मोठ्या दिमाखात पार पडला.
रेल्वे ओव्हर ब्रिज येथील मराठा मंदिर सभागृहामध्ये तालुका म. ए. युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणयेकर यांच्या अध्यक्षतेखाली या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सीमालढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुणे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शनपर विचार व्यक्त केल्यानंतर लष्कर, नौदल, हवाई दल, रेल्वे, बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ वगैरेमध्ये निवड झालेल्या युवक – युवतींचा सत्कार माजी आमदार किणेकर व युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणयेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कारमूर्तींमध्ये रोशनी वसंत मुळीक (कंग्राळी बुद्रुक), करुणा गेणूचे (मंडोळी), दीपा पाटील (सावगाव), तुषार पाटील (कंग्राळी खुर्द), आशीतोष बिळगोजी (हालगा), ओमकार पाटील (बस्तवाड), तुषार मल्लाप्पा पाटील (कंग्राळी बुद्रुक), प्रतीक पाटील (कंग्राळी बुद्रुक), समर्थ दत्ता आजरेकर (विनायक नगर बेळगाव), संतोष भरत पाटील (मंडोळी), मनीषा बुरुड (समर्थनगर बेळगाव), श्रेयस तारीहाळकर (कर्ले), वैभव जागृत (किणये), सुशांत नावगेकर (बोकनुर), भूषण बाचीकर (बेळगुंदी), ज्योतिबा पाटील (खादरवाडी), मंथन बिर्जे (हंदीगनूर), वैष्णवी पाटील (सोनोली), धनश्री कडोलकर (कंग्राळी बुद्रुक), भावेश्वरी कृष्णा गोंडाडकर (जाफरवाडी), भावना कृष्णा गोंडाडकर (जाफरवाडी), प्रसाद कडकोळ (कंग्राळी खुर्द), लखन चौगुले (बस्तवाड), प्रवीण विठ्ठल वडसुर (हिंडलगा), आशिष नजीर पपा (कंग्राळी बुद्रुक) आणि गणेश रमेश बिळगोजी (हालगा) या युवक -युवतींचा समावेश होता.
Belgaum Varta Belgaum Varta