
बेळगाव : येथील सीपीएड मैदानावर आज मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस अधिवेशनासाठी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार प्रियंका गांधी यांचे बेळगाव आगमान झाले आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेते काँग्रेस अधिवेशन कार्यक्रमाला बेळगावला आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, काँग्रेसचे लोकप्रतिनिधी अधिवेशनाला उपस्थित आहेत. आज सकाळी खासदार प्रियंका गांधी तसेच काँग्रेसच्या अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सुवर्णसौध येथे महात्मा गांधींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta