बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरूवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे.
आज प्राथमिक विभागाच्या शिक्षकांसाठी, “पुस्तक अभिवाचन व पुस्तक परीक्षण” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात प्राथमिक विभागाच्या ६ शिक्षकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक गजानन सावंत यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन गौरी चौगुले-ओऊळकर यांनी केले. या कार्यक्रमात सुनिता पाटील व शामला चलवेटकर यांनी लीला पाटील लिखित ‘परिवर्तनशील शिक्षण’, वरदा देसाई यांनी फुलोरा विद्यालय कोल्हापूर प्रकाशीत ‘फुलोरा फुलताना’, स्नेहल बेळगावकर यांनी डॉ पी व्ही वैद्यनातन लिखित ‘मुलांवरील तानतनाव कमी कसा करावा?’, रोहीणी सावंत यांनी लीला पाटील यांचे ‘शिक्षण घेता-देता’, माधूरी पाटील यांनी लीला पाटील लिखित ‘लिहीणं मुलांचं शिकणं शिक्षकांचं’ या पुस्तकाचे परीक्षण व अभिवाचन मांडले. असे शिक्षकांनी आपण वाचलेल्या पुस्तकांचे परीक्षण मांडून पुस्तक परीक्षणामागची भूमिका स्पष्ट केली. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचणाची आवड निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांची ओळख करून दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना व शिक्षकांना वाचणाची आवड निर्माण व्हावी, मराठी भाषा साहित्याची व साहित्यिकांची ओळख व्हावी हा उद्देश होता. प्राथमिक विभागाचे ४५ शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री जयंत नार्वेकर सचिव श्री सुभाष ओऊळकर, सदस्य धीरजसिंह राजपूत, नीला आपटे, इंद्रजीत मोरे, नारायण उडकेकर उपस्थित होते. आभार प्रदर्शन बी. बी. शिंदे सर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta