संजीवींनी फौंडेशनचा “उद्याच्या उज्वल भविष्यासाठी” कार्यक्रम संपन्न
बेळगाव : यश संपादन करण्यासाठी संघर्ष महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी या वयातच ध्येय ठरवावे. मन, मेंदू आणि मनगट यावर विश्वास ठेवून कामाला लागावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करावे तरच परीक्षेत गुणसंपादन करता येते, असे प्रा. युवराज पाटील यांनी सांगितले.
संजीवनी फाउंडेशनच्या वतीने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मंगळवारी (दि. २१) दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी “उद्याच्या उज्वल भविष्यासाठी” या मार्गदर्शन कार्यक्रमाचे बोलत होते.
पुढे बोलताना प्रा. युवराज पाटील म्हणाले वाचन, मनन आणि लेखन करून महत्त्वाच्या घडामोडींची माहिती आत्मसात करावी. चालू घडामोडींचा चांगला अभ्यास करावा. सरावाने विविध विषयांचे सखोल ज्ञान घेता येते. आजच्या विद्यार्थ्यांनी मोबाईल, टीव्ही पासून लांब राहावे. महत्त्वाच्या माहितीसाठी मोबाईलचा वापर करावा. पालकांनीही आपल्या मुलांच्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजेत. त्यांच्याशी सामंजस्याचेे संबंध ठेवणे गरजेचे आहे. तरच आपल्या मुलांची प्रगती साधता येते, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक करताना डॉ सविता देगीनाळ यांनी संजीवीनी फौंडेशनच्या कार्याचा आढावा घेताना संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अशा पध्दतीची व्याख्याने दरवर्षी भरवण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रा. युवराज पाटील, संजीवनी फाउंडेशनचे चेअरमन मदन बामणे, संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप करताना मदन बामणे यांनी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आजच्या व्याख्यानातून जे काही तुमच्या कानांनी ऐकलं आहे ते मेंदूपर्यंत घेऊन जाऊन ते आत्मसात केलंत तर आम्ही यशस्वी झाल्याचं समाधान मिळेल असे सांगितले आणि उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी महाराष्ट्र एकिकरण समीतीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. बी. कोंडसकोप, प्रा. एस. एस. जाधव, पीयु कॉलेजचे मुख्याध्यापक एस. आर. तिरविर, एसबीसी सदस्य नारायण कणबरकर, शामराव पाटील, एन. डी. बंडाचे, सुधीर पाटील, रेखा अंची, संजीवीनीच्या सल्लागार डॉ. सुरेखा पोटे, डॉ. नविना शेट्टीगार, विद्या सरनोबत आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta