Thursday , March 5 2026
Breaking News

श्री मंगाई नगर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

Spread the love

 

 

बेळगाव : हिंदुरुदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वडगाव येथील सोमेश्वरी हॉल श्री मंगाई नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि श्री मंगाई नगर रहिवासी संघ व महिला मंडळ यांच्या वतीने जयंती निमित्त फोटो पूजन करण्यात आले. फोटो पूजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बंडु केरवाडकर आणि मंगेश पोटे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या अगोदर बंडू केरवाडकर यांनी बाळासाहेबांबद्दल माहिती सांगितली आणि सीमा भागातील जनतेबद्दल किती आदर होता ते सांगितले. यावेळी श्रीधर बिरजे, आनंद गोंधळी, भालचंद्र उचगावकर, किशोर तळेकर, सहदेव रेमानाचे, सागर पाटील, महेश हसबे, प्रशांत हानगुजी, राम सांबरेकर, शुभम पवार, सदरे अण्णा, बाळू भोसले, रमण राव, रमेश कडोलकर, मंजू कडोलकर, आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *