
बेळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई व ठाणे जिल्हा पालकमंत्रिपदी निवड झाली आहे. याबद्दल ठाणे येथील ‘आनंद आश्रम’ येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर, समिती कार्यकर्ते विकास कलघटगी व बेळगाव जिल्हा बॉडीबिल्डिंग असोसिएशन सचिव राजेश लोहार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

समितीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गेल्या काही दिवसांपासून सीमाभागात सुरू असलेल्या घडामोडींची माहिती दिली. तसेच सीमाप्रश्नाची सोडवणूक लवकर व्हावी, यासाठी सरकारने लवकर पावले, उचलावीत, अशी मागणी केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta