Wednesday , March 4 2026
Breaking News

बसवंत शहापुरकर यांच्या ‘कवितेचं गाव’ उलगडणारा कार्यक्रम सोमवारी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळाची सोमवार दि. 27 जानेवारी 2025 रोजी संध्या. 5.30 वाजता शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथे श्रीमती अश्विनी ओगले यांच्या घरी बैठक बोलाविण्यात आली आहे.
यावेळी शब्दगंध कवी मंडळाचे जेष्ठ सदस्य कवी बसवंत शहापुरकर हे आपल्या ‘कवितेचं गाव’ या पहिल्या कविता संग्रहातील कवितांचे सादरीकरण करतील.
कवी बसवंत शहापुरकर गेली कित्येक वर्षे काव्य लेखन करीत असून त्यांचा ‘कवितेचं गाव’ हा कविता संग्रह म्हणजे अद्यापही शहरीकरणाचं वारं न लागलेलं एक निरागस गाव आहे. काळ्या मातीतून हिरवं रोपटं अंकुरावं इतकी सहज नैसर्गिक आणि लोभसवाणी काव्य लेखन करणारे कवी म्हणून शहापुरकर परिचित आहेत. यानिमित्ताने त्यांच्या काव्य लेखनामगाची प्रेरणा जाणून घेता येणार आहे. त्यानंतर शब्दगंध कवी मंडळांच्या सदस्यांचे काव्य वाचन होईल. आणि मराठी भाषा दिन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येईल.
तरी या कार्यक्रमाला कवी आणि काव्य रसिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन शब्दगंधचे अध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी आणि सचिव सुधाकर गावडे यांनी केले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *