Thursday , March 5 2026
Breaking News

विद्याप्रसारक मंडळाची ५५ वर्षाच्या आनंदोत्सवाची जय्यत तयारी

Spread the love

 

बेळगाव (सौजन्य मिलिंद देसाई) : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती करीत असलेल्या एसपीएम रोड येथील विद्या प्रसारक शिक्षण मंडळाचे 55 व्या वर्षात पदार्पण होत आहे. यानिमित्त 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध गायिका बेला शेंडे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळावे यासाठी बेळगाव शहराचे पहिले नगराध्यक्ष कै. गजाननराव भातकांडे यांनी 1971 मध्ये विद्या प्रसारक शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. विद्या प्रसारक शिक्षण मंडळाचे 55 व्या वर्षात पदार्पण होत असल्याने आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरु आहे. गजाननराव भातकांडे इंग्लिश मिडियम शाळेचे विद्यार्थी, शिक्षकवर्ग, माजी विद्यार्थी, पालक वर्ग, हितचिंतक सर्वजण या सोहळ्यासाठी उस्फुर्तपणे सज्ज आहेत. आयनॉक्स सिनेमा येथून शोभा यात्रेला सायंकाळी ४ वाजता सुरुवात होणार आहे त्यानंतर अंबा भुवन, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल, एसपीएम रोड मार्गे शिवसृष्टीसमोर संध्याकाळी ६ वाजता आगमन होणार आहे. शोभा यात्रेची सांगता झाल्यानंतर गायिका बेला शेंडे यांच्या गायनाचा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत, अशी माहिती शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी दिली आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *