बेळगाव : प्रयगराज येथील महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत वडगाव भागातील आई आणि मुलीचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला.
ज्योती हत्तरवाड (50) आणि मेघा हत्तरवाड रा. वडगावी अशी मृतांची नावे आहेत. कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर दोघीनांही प्रयागराज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार निष्फळ ठरल्याने दोघींचाही मृत्यू झाला. आज (बुधवार) सकाळपासून बेळगाव येथील कुटुंबीयांचा दोघींशीशी संपर्क होऊ शकलेला नाही. फोन वाजत असतानाही तो रिसिव्ह न झाल्याने कुटुंबीय चिंतेत होते. तीन दिवसांपूर्वी तो साईरथ ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून १३ जणांच्या समूहासोबत त्या गेल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे.