बेळगाव : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगाव येथील मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता तीन झाली आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्या असलेल्या कांचन कोपर्डे यांच्या पतीचेही या चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वडगाव येथील आई आणि मुलगी तसेच बेळगाव शेट्टी गल्ली येथील अरुण कोपर्डे असे एकूण तीन जण कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडले असल्याची माहिती समोर येत आहे.