
बेळगाव : अर्थसंकल्पात बेळगाव शहरातील उड्डाणपूल व रिंगरोडच्या बांधकामाला मंजुरी मिळावी यासाठी जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बैठक घेतली.
जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी फ्लाय ओव्हर आणि रिंगरोडच्या निळ्या नकाशाचा आढावा घेतले आणि इतर कोणती क्षेत्रे जोडता येतील यावर चर्चा केली.
यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta