
बेळगाव : यंदाच्या वर्षी गणेश उत्सव दरम्यान शेवटच्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीत कपलेश्वर उडान पुलावरती दुर्घटनेत मृत पावलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आज देण्यात आली. मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री. रमाकांत दादा कोंडूस्करांच्या नेतृत्वाखाली आवाहन करण्यात आलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बेळगाव येथील विविध गणेश मंडळांनी आर्थिक मदत महामंडळाकडे दिली होती. आज ती रक्कम एकत्रित करून दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबियांना देण्यात आले. आर्थिक मदत देतेवेळी मध्यवर्तीचे पदाधिकारी श्री. चंद्रकांत कोंडुस्कर, मध्यवर्ती महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख श्री. विकास कलघटगी, महामंडळाचे कार्यकारी सचिव प्राचार्य श्री. आनंद आपटेकर, दसरा महामंडळाचे श्री. सचिव विजय तमुचे, बेळगावचा राजा मंडळाचे अध्यक्ष कु.श्रीनाथ पवार, बळवंत शिंदोळकर, कुंज नावगेकर, विनायक पवार, प्रथमेश मोहिते, प्रशांत आंबेवाडीकर, विनायक सावंत, रवी गोडसे, रोहन सावंत
दुर्घटनेत मृत पावलेले कै. सदानंद चव्हाण पाटील
त्यांची पत्नी रूपा सदानंद चव्हाण पाटील व कै. विजय राजगोळकर तेगीन गल्लीत वडगाव त्यांच्या कुटुंबियांना रक्कम पोहोचवण्यात आली.
श्री सार्वजनिक उत्सव मंडळ कोनवाळ गल्ली छत्रपती शिवाजी रोड बेळगांव
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खडे बाजार बेळगांव
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ताशिलदार गल्ली बेळगांव
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेहरूनगर बेळगाव
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महाद्वार रोड बेळगाव
आनंद आपटेकर
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हेस टॉकीज रोड बेळगाव
गोवावेसचा राजा रामलिंगवाडी शहापूर
सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळ अष्टविनायक नगर वडगाव बेळगांव
सिंहगर्जना युवक मंडळ कोनवाळ गल्ली बेळगांव
या सर्व गणेश उत्सव मंडळाने आर्थिक स्वरूपात महामंडळाकडे रक्कम पोचवली होती.
विविध मंडळांनी आपले मंडळाच्या वतीने एक सार्वजनिक विचार धरून एक पाऊल पुढे घेऊन या दुर्घटनेत मदत दिली. त्याबद्दल कुटुंबीयांच्या वतीने व महामंडळाच्या वतीने त्या सर्व मंडळांचा आभार व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta