Monday , September 21 2026
Breaking News

सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी ४ फेब्रुवारी रोजी मच्छे हेस्कॉम कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

Spread the love

 

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा जाहीर पाठिंबा

बेळगाव : मच्छे हेस्कॉम कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मच्छे, वाघवडे, संती बस्तवाड, कर्ले, किणये, बाळगमट्टी आदी भागामधील शेतकऱ्यांवर सुरळीत वीजपुरवठा करणे बाबत अन्याय केला जात आहे. शेतकऱ्यारयांना दिवस सात तास त्रिफेज वीजपुरवठा करणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना दिवसा पाच तास आणि रात्रीच्या वेळी 10 ते 12 च्या दरम्यान पुन्हा दोन तास त्री फेज वीजपुरवठा केला जातो. पण रात्रीच्या वेळी केला जाणारा वीजपुरवठा हा शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतं नसल्याने दिवसा सलग सात तास त्रि फेज वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे तसेच रात्रीच्या वेळी या भागात वीजपुरवठा नसल्याने शेतकऱ्यांसह शाळकरी मुले, जनावरे या सोबत पोल्ट्री व्यवसाय आदी गोष्टींवर परिणाम होत आहे आणि मोठे नुकसान होत आहे त्यामुळे किमान रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजपुरवठा केला जावा या मागणीसाठी शेतकर्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून दिनांक 4 फेब्रुवारी रोजी मच्छे हेस्कॉम कार्यालयासमोर सकाळी 11.00 वाजल्यापासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या भागातील शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून या आंदोलनाला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पाठिंबा दिला आहे. तरी तालुका समितीच्या माध्यमातून बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

अंबोली घाटात दरड कोसळली; बेळगाव – सिंधुदुर्ग वाहतूक विस्कळीत

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध अंबोली धबधब्याजवळ मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *