Sunday , September 8 2024
Breaking News

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग

Spread the love

येळ्ळूर : येळ्ळूर येथील ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 17 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवारी दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी श्री शिवाजी विद्यालयांमध्ये होणार आहे. यानिमित्त संमेलनाची तयारी जोमात सुरू झाली असून, संमेलन नगरीचे नामकरण दिवंगत एल. आय. पाटील संमेलन नगरी असे करण्यात आले आहे. तसेच संमेलन सभागृहाचे नामकरण दिवंगत परशराम बेडका सभागृह असे करण्यात आले आहे. 17 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घघाटन नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने होणार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश धामणेकर उपस्थितांचे स्वागत करतील. संमेलनाच्या पहिल्या सत्रात चंदगडचे साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार दळवी यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. संमेलन नगरीचे उद्घघाटन येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते होणार आहे. दिवंगत परशराम बेडका सभागृहाचे उद्घघाटन ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील यांच्या हस्ते होणार आहे. व्यवसायिक शिवाजी केदारी गोरल यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन होईल, ग्रामपंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन होईल, ग्रामपंचायत सदस्या रुक्मिणी नाईक यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन, ग्रामपंचायत सदस्या राजकुंवर पावले व शांता काकतकर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन होणार आहे, त्याचबरोबर मुख्याध्यापक बबन कानशिडे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर प्रतिमेचे पूजन होईल, अग्रीकल्चर ऑफिसर बाबागौडा पाटील यांच्या हस्ते कुसुमाग्रजाच्या प्रतिमेचे पूजन होईल, तर माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दूधाप्पा बागेवाडी यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद विचार पीठाचे उद्घघाटन होणार आहे. संमेलनात बेळगाव बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ॲड. सुधीर चव्हाण यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या सत्रात राधानगरी -कोल्हापूर येथील हास्य कलाकार संभाजी यादव यांचा हास्य -दरबार हा विनोदी कार्यक्रम हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा. असा हा बहारदार कार्यक्रम होणार आहे. संमेलनानंतर साहित्य रसिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे तेव्हा बेळगाव व परिसरातील साहित्यिक बंधू-भगिनी व नागरिक यांनी साहित्य संमेलनाला उपस्थित रहावे, असे आवाहन येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने अध्यक्ष परशराम मोटराचे, कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल व सचिव डॉ. तानाजी पावले यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *