
मिरज : प्रयागराज येथे सुरू असणार्या कुंभमेळ्यासाठी दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून हुबळी ते बनारस विशेष रेल्वे सोडण्यात आली आहे. या रेल्वेचे आरक्षण देखील आता फुल्ल झाले आहे.
प्रयागराज येथे कुंभमेळा पार पडत आहे. यासाठी दक्षिणेतून आणि पश्चिम महाराष्ट्रातून कुंभमेळ्यासाठी जाणार्या भक्तांसाठी दक्षिण – पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून विशेष रेल्वे सोडण्यात आली आहे. ही एक्स्प्रेस दि. 14, 21 आणि 28 फेब्रुवारी रोजी धावणार आहे, तर परतीच्या प्रवासात ही गाडी दि. 15, 22 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी धावणार आहे. या गाडीचे आरक्षण खुले होताच प्रवाशांचा उदंड प्रतिसाद पाहावयास मिळाला. आरक्षण खुले होताच अवघ्या काही तासात या गाडीचे आरक्षण देखील आता फुल्ल झाले आहे. या रेल्वेचा जास्तीत जास्त भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मिरज रेल्वे कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta