
बेळगाव : अनगोळ येथील श्री कलमेश्वर मंदिर, श्री मरगाई देवी मंदिर व श्री रेणुका देवी मंदिर या सर्व मंदिरांना पूजा व धार्मिक विधी करण्यासाठी सरकारकडून मिळणार निधी गेल्या दोन वर्षांपासून रखडला होता. याची माहिती या सर्व मंदिर मध्ये सेवा बजावणाऱ्या पूजाऱ्यांनी तो निधी परत सुरू करावा यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर व उमेश कुऱ्याळकर यांची कांही दिवसापूर्वी भेट घेऊन प्रयत्न करा विनंती केली होती. याची दखल घेत रमाकांत कोंडुस्कर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून तो निधी पुन्हा सुरू केला. यासाठी अनगोळ गावातील सर्व देवस्थान कमिटीच्या सदस्यांनी रमाकांत कोंडुस्कर व उमेश कुऱ्याळकर यांचे विशेष आभार मानले आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta