
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील भूतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील मादी सिंहाचा मृत्यू झाला आहे.
निरुपमा नावाच्या 15 वर्षीय मादी सिंहाचा आज दुपारी 12:55 वाजता वृद्धापकाळ आणि अनेक अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. वन्यजीव डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निरुपमा सिंहावर गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरू होते. नंतर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शवविच्छेदन तपासणी करण्यात आली आणि नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रक्रियेत प्राणिसंग्रहालयाचे कार्यकारी संचालक मारिया कृष्ण राजा, विभागीय वन अधिकारी पवन कुरणिंग, मल्टी स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. हणमंत सनक्काई, प्रादेशिक संशोधन अधिकारी, बेळगावचे तज्ज्ञ डॉ. श्रीकांत कोहळ्ळी, प्राणिसंग्रहालयाचे डॉक्टर डॉ. नागेश हुइलगोळ आणि प्राणीसंग्रहालयाचे कर्मचारी होते.

Belgaum Varta Belgaum Varta