
दड्डी : मोदगे तालुका हुक्केरी गावची भावेश्वरी श्री देवीची यात्रा गुरुवार 13 फेब्रुवारी पासून ते 15 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे. यात्रा उत्सव कमिटी मोदगे. ग्रामपंचायत सलामवाडी वतीने यात्रेची तयारी सुरू केली आहे.
यात्रेचे कार्यक्रम…..
गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी शस्त्रइंगळ्या. सायंकाळ 6 ते शुक्रवार सकाळ 6 पर्यंत सुरू राहील. शुक्रवार 14 फेब्रुवारी भर यात्रा. शनिवार 15 फेब्रुवारी पालखी सोहळ्याने यात्रेची सांगता होणार आहे.
भावेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त बेळगाव, हुक्केरी, खानापूर, निपाणी, चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील अनेक भाविक या यात्रा उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे यात्रेचे नीटनेटके नियोजन ग्रामपंचाय व यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे
यात्रा परिसरात ज्या व्यापाऱ्यांना आपली दुकाने लावायची असतील तर त्यांनी जागेचा कर सलामवाडी ग्रामपंचायतकडे भरावा 1993 च्या ग्रामपंचायत कायद्याचे काटेकोर पालन असे ग्रामपंचायतीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे परिवहन मंडळाच्या वतीने बेळगाव परिवहन महामंडळ महाराष्ट्रातील गडहिंग्लज आगारातून विशेष बसची सोय करण्यात आली आहे. ग्रामपंचायत वतीने पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सेवा सुरळीत करण्यात येणार आहे. यात्रा काळात कोणतीही कमतरता भासल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने त्या समस्या सोडवल्या जातील.
सूचना
सलामवाडी ग्रामपंचायत परवानगीशिवाय कोणीही दुकान किंवा स्टॉल मांडू नयेत. ग्रामपंचायतच्या वतीने दिलेल्या जागेपेक्षा जागा जास्त व्यापल्यास जादा रक्कम आकारण्यात येईल. ग्रामपंचायत पावती काढल्याशिवाय कोणतेही दुकान लावण्यास परवानगी दिली जाणार नाही. घटप्रभा नदीकडील दुकानदारांना सुद्धा पावती काढावी लागेल. पावती घेतल्याशिवाय बकरी विक्रीला परवानगी नाही असे ग्रामपंचायतीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
कोंबडी व बकरी बाजाराची जागा
मोदगे – सलामवाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गायरानमध्ये भरवण्यात येईल याची भाविकांनी व व्यापारी बांधवांनी नोंद घ्यावी तसेच घटप्रभा नदीला पाणी खूप असल्यामुळे भाविकांनी कृपया मोदगे बंधाऱ्यावरून वाहतूक करावी.

Belgaum Varta Belgaum Varta