
बेळगाव : वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळालातील सोमवारी सकाळी महाअभिषेकानंतर सायंकाळी पालखी उत्सव पार पडला. यावेळी वैश्य समाजातील बांधव आणि भाविक मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने भाग घेतला होता. सोमवारी सकाळी चौघडा व काकड आरतीनंतर श्री.समादेवीला महाअभिषेक करण्यात आला. यावेळी अध्यक्ष दत्ता कणबर्गी, विश्वस्त मोहन नाकाडी, महादेव गावडे, मोतीचंद दोरकाडी, सेक्रेटरी अमित कुडतुरकर, युवा संघटना अध्यक्ष रोहन जुवळी, उपाध्यक्ष रवी कलघटगी, महिला मंडळाच्या अध्यक्षा अंजली किनारी, सेक्रेटरी वैशाली पालकर, अक्षता कलघटगी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. दुपारी मिष्टान्न व महानैवेध दाखविण्यात आला. यानंतर श्री. समादेवीला महिला वर्गानी ओटी भरण्यास प्रारंभ केला. सायंकाळी पुराण वाचन झाल्यानंतर, श्रीच्या पालखीला प्रारंभ झाला. चार प्रदक्षिणा श्री समादेवी मंदिराला तर पाचवी प्रदक्षिणा समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्ली येथून समादेवी मंदिरापर्यंत येऊन समाप्त झाली. याप्रसंगी हजारो भक्तांनी या पालखी सोहळा सहभाग दर्शविला होता. समाज मर्यादित झालेल्या विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी पार पडला. मंगळवार दुपारी १२ वाजल्यानंतर महाप्रसादा प्रारंभ होणार आहे. या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे संयोजक समितीने कळविले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta